देशाच्या संसदेत तुम्हाला बहुमतं असलं तरीही आम्हाला कृषी कायदा मान्य नाही, शेतकऱ्यांच्या या भूमिकेचा विजय झाला आहे. हा एक ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिली आहे. आज कृषी कायदे मागे घेणार असल्याचे मोदींनी जाहीर केलं आहे. या निर्णयावर राज्यभरातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे
#rajushetti #farmersbill #maharastra #sakal